महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

BAALVEER : 12 वर्षीय वीरबालेने आपल्या जीवाची पर्वा न करता लहान भावाला मृत्यूच्या दाढेतून काढले बाहेर - बालदिन

बाल दिवस (children's Day)च्या निमित्त बालवीर (Baalveer) जाह्नवी राजपूत (Jhanvi rajput) च्या अशा धाडसी कार्याविषयी सांगणार आहोत ज्यामुळे प्रत्येक जण जाह्नवीची हिंमत व धाडसाचे कौतुक करत आहे. इतकेच नाही तर जाह्नवी इतरांसाठी एक आदर्श ठरत आहे.

Jhanvi rajput
Jhanvi rajput

By

Published : Nov 14, 2021, 5:25 AM IST

धमतरी - म्हणतात ना धाडसाहून मोठी ताकद कोणतीच नाही. जर वेळेवर हिंमत दाखवली तर माणूस कोणत्याही संकटातून सहज तरून जाईल. आज आम्ही एका अशा बालवीर बद्दल सांगणार आहोत ते कोणत्याही आदर्शाहून कमी नाही. धमतरी (Dhamtari) येथे राहणारी साहसी बालिका जाह्नवी राजपूत (Jhanvi rajput) ने असा कारनामा केला आहे, ज्यामुळे तिला राज्य वीरता पुरस्काराने (State Gallantry Award) गौरवान्वित करण्यात आले आहे.

बाल दिवस (children's Day)च्या निमित्त बालवीर जाह्नवी (Baalveer Jhanvi) च्या त्या अतूलनीय कार्याबद्दल जाणून घेऊया, ज्यामुळे राज्यभरात तिचे कौतुक होत आहे.

वीरबालेने लहान भावाला मृत्यूच्या दाढेतून काढले बाहेर

काय आहे संपूर्ण घटना -

धमतरी जिल्ह्यातील कुरूद येथे राहणाऱ्या जाह्नवी राजपूतने प्रसंगावधान दाखवत आपला जीव धोक्यात घालून विद्युत शॉक लागलेल्या आपल्या भावाला (Jhanvi Brother ) वाचवले होते. 2020 साल व 15 ऑगस्टचा दिवस.. सकाळचा साडे अकरा वाजण्याचा सुमार आणि अशी एक घटना घडली आणि सर्वांचा जीव टांगणीला लागला. कारगिल चौक येथे राहणारे भारत भूषण राजपूत यांचा पाच वर्षाचा मुलगा शिवांश राजपूत घराच्या छतावर खेळत होता. छताची उंची जवळपास 14 फूट होती. खेळत-खेळत शिवांश छताजवळून जाणाऱ्या विद्युत तारेला चिटकला. शिवांशला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याची आई व बहीण विद्युत धक्क्याने दूर फेकल्या गेल्या. शिवांश विद्युत तारेला चिटकून (trapped in electric wire) तडपू लागला होता. त्यावेळी शिवांशची 12 वर्षीय मोठी बहीण जाह्नवी राजपूतने समजदारी दाखवत छतावर असणारा बांबू उचलला व लाईटच्या तारेला ती जोर-जोरात मारू लागली. यामुळे शिवांश विद्युत तारेपासून दूर गेला मात्र छतावरून खाली पडू लागला. त्यावेळी जाह्नवी पुन्हा त्याच्यासाठी देवदूत म्हणून धावून आली व त्याचा हात पकडून शिवांशला वर ओढले व त्याचा जीव वाचवला.

हा होता जाह्नवीचा कारनामा... तिच्या या साहसिक कार्यामुळे जाह्नवीला राज्य वीरता पुरस्काराने सन्मानित केले गेले.

हे ही वाचा -कोल्हापुरातल्या 'या' गावडे बहिणींचा आगळावेगळा विक्रम; बालदिनानिमित्त 'ईटीव्ही भारत'ची विशेष मुलाखत

वडिलांपासून मिळाली प्रेरणा -

जेव्हा ETV भारतने धाडसी जाह्नवीशी बातचीत केली त्यावेळी जाह्नवीने सांगितले की, याची प्रेरणा तिला तिच्या वडिलांपासून मिळाली होती. एका दिवशी तिला वडिलांशी सांगितले होते की, बांबूमध्ये विद्युत करंट येत नाही. ही गोष्ट तिने लक्षात ठेवली होती. पहिल्यांदा तिला वाटले की, कदाचित ती आपल्या भावाला वाचवू शकणार नाही. मात्र वडिलांशी शिकवण व प्रसंगावधान दाखवत आपला जीव धोक्यात घालून तिने अखेर आपल्या छोट्या भावाला मृत्यूच्या दाढेतून परत आणले.

हे ही वाचा -Google Boy : अडीच वर्षाच्या बालकाची उत्तरे ऐकून डोकं जाईल चक्रावून.. मेमरीत फीड जगभरातील जनरल नॉलेज

जिल्ह्याबरोबरच राज्यभरातून बालवीर जाह्नवीचे कौतुक -

जाह्नवीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या आपल्या मुलीच्या धाडसी कार्याचा अभिमान आहे. शहरातील नागरिकही जाह्नवीचे कौतुक करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details