महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

MP Supported Shinde Group : ठाकरे गटाला मोठा धक्का; सभागृह नेतेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती तर भावना गवळीच बजावणार व्हीप - एकनाथ शिंदेंच्या गटाला दिला पाठिंबा

दिल्लीला येण्याची दोन कारणे होती, एक तर खासदारांच्या समर्थनाचे पत्र आणि दुसरे म्हणजे ओबीसी आरक्षणासंबंधी वकिलांची भेट असल्याचे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तसेच महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या विचाराची भूमिका, आनंद दिघे यांचे विचार हे घेऊन आम्ही महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन केले, असेही ते म्हणाले. ( 12 Shiv Sena MP letter to Lok Sabha Speaker )

eknath shinde group
एकनाथ शिंदे

By

Published : Jul 19, 2022, 6:25 PM IST

Updated : Jul 19, 2022, 11:01 PM IST

नवी दिल्ली - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde Met Shivsena MP ) यांनी आज दिल्लीत शिवसेनेच्या (शिंदे गट) 12 खासदारांची भेट घेतली होती. एकनाथ शिंदे (Eknath Shinde in Delhi) हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता पक्षाच्या १९ पैकी १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना एक पत्र सादर केले आहे. त्यात त्यांनी १२ खासदारांचा स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी केली आहे. लोकसभा अध्यक्षांनी शिंदे गटांच्या खासदारांची मागणी मान्य केली आहे. तर शिवसेना सभागृह नेतेपदी राहुल शेवाळे यांची निवड केली आहे. तर भावना गवळी यांना मुख्य व्हीप म्हणून कायम ठेवण्यात आले आहे.

अध्यक्षांनी शिवसेना गटाच्या मागणीला दिली मान्यता - शिवसेनेच्या शिंदे गटाची सभागृह नेता बदलण्याची मागणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्य केली आहे. आता शिवसेनेचे सभागृह नेते राहुल शेवाळे असतील. तर, भावना गवळी यांना मुख्य व्हीप म्हणून कायम ठेवण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बंडखोर गटात सामील झालेल्या १२ खासदारांनी मंगळवारी सकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना याबाबत पत्र सादर केले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत शिवसेनेच्या १२ खासदारांची भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिंदे यांच्यासह बारा खासदारांनी हजेरी पत्रकार परिषदेला होती.

हेही वाचा - Udhhav Thackeray : 'कितीही बाण घेऊन जा, धनुष्य माझ्याकडेच'; उद्धव ठाकरे यांचा बंडखोरांवर निशाणा

शिवसेनेचे बारा खासदार उपस्थित - या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते शेवाळे, मुख्यप्रतोद भावना गवळी, कृपाल तुमाने, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, प्रतापराव जाधव, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, हेमंत पाटील, अप्पा बारणे, राजेंद्र गावीत, श्रीकांत शिंदे उपस्थित होते. दिल्लीला येण्याची दोन कारणे होती, एक तर खासदारांच्या समर्थनाचे पत्र आणि दुसरे म्हणजे ओबीसी आरक्षणासंबंधी वकिलांची भेट असल्याचे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तसेच महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या विचाराची भूमिका, आनंद दिघे यांचे विचार हे घेऊन आम्ही महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन केले, असेही ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

हेही वाचा - CM Eknath Shinde met Shiv Sena MP : ठाकरेंना धक्का; मुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेनेच्या 12 खासदारांची दिल्लीत घेतली भेट

लोकसभा अध्यक्षांना पत्र - महाराष्ट्रातल्या जनतेकडून मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. अडीच वर्षांपूर्वी व्हायला पाहिजे होते आता झाले आहे, जनतेच्या मनातल्या सरकार आम्ही स्थापन केले आहे. ओबीसी आरक्षणबाबत वकिलांशी चर्चा आज आम्ही केली आहे. केंद्र सरकारचे महाराष्ट्र सरकारला पाठिंबा देत आहे. मदतीबाबत कोणतीही काटकसर होणार नाही, असे आश्वासन गृहमंत्री व पंतप्रधानांना दिलेले आहे. याबद्दल त्यांना धन्यवाद देतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. बारा खासदारांनी बाळासाहेबांच्या विचारांचे स्वागत केले आहे. त्यामुळे त्यांनी लोकसभा स्पीकरला तसे पत्र दिले आहे. सभापती ओम बिर्ला यांनी राहुल शेवाळे यांना लोकसभेतील शिवसेना नेते म्हणून मान्यता दिली आहे असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्रात सर्वसामान्य लोकांसाठी जेवढे चांगले काम करता येईल ते काम करत आहोत. लोकांचे सरकार कुठेही कमी पडणार नाही असेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तर बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणार अशी प्रतिक्रिया यावेळी खासदार शेवाळे यांनी दिली आहे.

'...म्हणून युती फिस्कटली' :राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर ठाकरे आणि मोदी या दोघांत स्वतंत्रपणे चर्चा झाली होती. चार ते पाच वेळा दिल्लीत बैठकही झाल्या. माझ्यासह पाच खासदार यावेळी बैठकीला उपस्थित होते. दरम्यान विधानसभेच्या अधिवेशनात भाजपाच्या 12 खासदारांवरती निलंबनाची कारवाई केली. एकीकडे युतीची चर्चा करत असताना दुसरीकडे भाजप आमदारांवर कारवाई करणे, हे भाजपा पक्ष नेतृत्वाला पटले नाही. त्यामुळे युतीची चर्चा फिस्कटली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची युतीची चर्चा फिस्कटल्यानंतर, तुमच्या स्तरावर भाजपशी युती करा, असे आदेश दिले. त्यानुसार आम्ही आता भाजपासोबत युती केल्याचे गंभीर आणि खळबळजनक विधान राहुल शेवाळे यांनी केले.

'आम्ही एनडीएसोबतच' :एकनाथ शिंदे यांचे 20 जून रोजी बंड झाल्यानंतर ठाकरे यांनी बोलविलेल्या बैठकीतही अनेक खासदारांनी भाजपासोबत जाण्याचा विचार बोलून दाखवला होता. तेव्हाही ठाकरे यांनी तयारी दाखवली होती. मात्र संजय राऊत आणि विनायक राऊत यांनी त्याविरोधात जाहीरपणे भूमिका घेतली. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत शिवसेना खासदारांना पुन्हा निवडून यायचे असेल तर भाजपासोबत जाण्याशिवाय पर्याय नाही, असे आम्ही अनेकदा सांगूनही तो निर्णय न झाल्याने आम्ही आता भाजपासोबत जाण्याचे ठरविले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठींबा देऊन आम्ही एनडीएसोबतच आलो, असे शेवाळे यांनी सांगताना शिवसेना एनडीएतून अधिकृतरित्या बाहेर पडल्याचे पत्र नाही. तसेच यूपीएत प्रवेश केल्याचेही शिवसेनेकडे अधिकृत पत्र नसल्याचा दावा शेवाळे यांनी केला.

हेही वाचा -Truck Auto Accident : ट्रक व ऑटोच्या भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू

Last Updated : Jul 19, 2022, 11:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details