बिकानेर राजस्थान महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये सुरू असलेल्या भारत आणि ओमानच्या सैन्यांमधील अल नजाह या संयुक्त लष्करी सरावाचा शुक्रवारी समारोप झाला Joint Military Exercise Al Najah in Bikaner . यावेळी भारत आणि ओमानच्या लष्कराने बिकानेरच्या महाजनमध्ये संयुक्त सराव करून आपली ताकद दाखवून दिली India and Oman Joint Military Exercise .
१ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या सरावाच्या शेवटच्या दिवशी दोन्ही देशांच्या जवानांनी दहशतवादी हल्ला हाणून पाडला. दोरीच्या सहाय्याने हेलिकॉप्टरमधून खाली उतरलेल्या इंडो-ओमान सैन्याने संयुक्तपणे एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्याचवेळी दुसऱ्या घरात ओलीस ठेवलेल्या लोकांनाही जवानांनी सोडवले.