भोपाळ : चालत्या बसमधून हात किंवा डोकं बाहेर काढू नये असं आपल्याला नेहमी सांगण्यात येतं. मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यामध्ये एका बसमधून बाहेर पाहणाऱ्या ११ वर्षाच्या चिमुरडीचं डोकं ट्रकच्या धडकेत धडावेगळं झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर बसमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये मोठा गदारोळ झाला.
मंगळवारी याबाबत माहिती समोर आली. पोलीस प्रभारी रमेश गवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीचे नाव तमन्ना होते. ती आपल्या कुटुंबीयांसह इंदूरला जात होती. खंडवापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असणारअया रोशिया गावाजवळ असणाऱ्या एका पुलावरुन ही बस जात असताना; समोरुन येणारा एक ट्रक बसला घासून गेला. यावेळी दुर्दैवाने ही मुलगी खिडकीतून बाहेर डोकावत होती. ट्रकच्या धडकेत तिचं डोकं धडावेगळं झालं.