महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जगण्याची दुर्दम्यशक्ती; 105 वर्षांच्या राधिका देवींनी घेतली कोरोनाची लस

कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता सरकारकडून लसीकरणाची मोहिम वेगाने करण्यात येत आहे. काही सामाजिक कंटक लोक कोरोना लशीबाबत अफवा पसरवित आहेत. मात्र, अशा अफवांकडे दुर्लक्ष करत १०५ वर्षांच्या राधिका देवी यांनी कोरोना लस घेतली आहे.

Radhik Devi
राधिका देवी

By

Published : Jun 24, 2021, 3:50 PM IST

पाटणा- जर इच्छाशक्ती असेल तर कोणतीही कारणे तुमच्यासमोर अडचणी म्हणून येणार नाहीत. हीच गोष्ट बिहारमध्ये १०५ वर्षांच्या राधिका देवी (105 Years Radhika Devi) यांनी दाखवून दिली आहे. गैरसमजातून अनेक जण कोरोनाची लस घेण्याचे टाळत असताना राधिका देवी यांनी कोरोनाची लस घेत सर्वांना आदर्श घालून दिला आहे.

राधिका देवी या सिंहवाडा प्रखंडमधील भरवारा पंचायतमधील रहिवाशी आहेत. त्यांनी उत्साहाने लस घेतल्याचे दरभंगाचे जिल्हाधिकारी डॉ. त्यागराजन यांनी सांगितले. जिल्हाधिकारी म्हणाले, की जिल्हा प्रशासन अशा लोकांच्या उत्साहाला वंदन करत आहे.

हेही वाचा-सोनिया गांधींनी बोलावली AICC ची बैठक; कोरोना आणि इंधन दरवाढीवर चर्चा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकडे दुर्लक्ष करत घेतली लस-

कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता सरकारकडून लसीकरणाची मोहिम वेगाने करण्यात येत आहे. काही सामाजिक कंटक लोक कोरोना लशीबाबत अफवा पसरवित आहेत. मात्र, अशा अफवांकडे दुर्लक्ष करत १०५ वर्षांच्या राधिका देवी यांनी कोरोना लस घेतली आहे.

हेही वाचा-मुंबईत पेट्रोल आजपर्यंतच्या उच्चांकी पातळीवर; जाणून घ्या, तुमच्या शहरातील दर!

बिहारमध्ये लसीकरणाची मोठी मोहिम-

बिहारमध्ये २० जूनपासून लसीकरणाची मोठी मोहिम सुरू झाली आहे. तर पाटणामध्ये लोकप्रतिनिधींना व दुकानदारांना लस देण्यासाठी लसीकरणाची विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. चालू महिन्यात एकूण ६ कोटी लोकांना लस देण्याचे सरकारने उद्दिष्ट ठेवले आहे.

हेही वाचा-शिवसेनाविरूद्ध बनावट शिवसेना, पंजाबमध्ये बनावट पक्ष कार्यरत

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम-

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी आपल्याकडच्या लहान मुलांचे लसीकरण करण्यावर भर दिला आहे. आता भारतातही लहान मुलांना लस देण्यात येणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरपासून लहान मुलांचे लसीकरण सुरू होऊ शकते, अशी माहिती एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी आज दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details