डेहराडून - जगभरामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला असून रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढताना दिसत आहे. महाराष्ट्र, गुजरात या राज्यांपाठोपाठ उत्तराखंडमध्येही रुग्णवाढ होताना दिसत आहे. हरिद्वारमधील महाकुंभमेळ्यात जवळपास 102 साधू व भक्तांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे.
हरिद्वारमध्ये कुंभमेळा भरला आहे. कुंभमेळ्याच्या बाराव्या दिवशी दुसरं शाही स्नान पार पडलं. यावेळी पवित्र स्नानासाठी साधूंसह भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कुंभमेळ्यासाठी लाखो साधू हरिद्वारमध्ये दाखल झाले आहेत. उत्तराखंडच्या आरोग्य विभागाकडून भाविकांच्या चाचण्या करण्यात येत आहे दुसर शाही स्नान पार पडले असून तिसरं शाहीस्नान बुधवारी होणार आहे.