बंगळुरू -कोरोनाच्या काळात कर्नाटक सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी 100 टक्के क्षमतेने चित्रपटगृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री बोम्माई यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.
कर्नाटकमध्ये 100 टक्के क्षमतेने चित्रपटगृहे सुरू होणार आहेत. मात्र, ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा दर 1 टक्क्यांहून कमी आहे, त्या जिल्ह्यांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा-भारताशी नाते असलेल्या कमला हॅरिस यांना पंतप्रधान मोदींनी या' दिल्या खास भेटवस्तू
या असणार अटी-
- ज्या जिल्ह्यांमध्ये 1 ते 2 टक्के कोरोना संसर्गाचे प्रमाण आहे, त्या जिल्ह्यांमध्ये 50 टक्के क्षमतेने चित्रपटगृहे सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण 2 टक्क्यांहून अधिक आहे, अशा जिल्ह्यांमध्ये चित्रपटगृहे बंद राहणार आहेत.
- चित्रपटगृहामध्ये येणाऱ्या प्रेक्षकांकरिता कोरोनाचा एक डोस बंधनकारक आहे. मात्र, महिला आणि मुलांना चित्रपटगृहांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
हेही वाचा-पेट्रोलसह डिझेल जीएसटीच्या कक्षेत कधी येणार? निर्मला सीतारामन यांनी 'हे' दिले उत्तर