महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Murder Of a 10-year-old girl: बिहारमध्ये शुल्लक कारणावरून 10 वर्षीय मुलीची हत्या - बिहारमध्ये शुल्लक कारणावरून मुलीची हत्या

आजकाल लोक किती कृर काम करतील याचा नेम नाही. छोट्या-छोट्या गोष्टींवर कुणाचा तरी जीव घेण्याचा त्यांना आनंद कसा मिळतो. त्यांना या कृत्याचे काहीच कसे वाटत नाही. (Murder Of a 10 year old Girl ) अशीच एक घटना पश्चिम चंपारणमधून समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

बिहारमध्ये शुल्लक कारणावरून 10 वर्षीय मुलीची हत्या
बिहारमध्ये शुल्लक कारणावरून 10 वर्षीय मुलीची हत्या

By

Published : Jul 1, 2022, 7:04 PM IST

बेतिया (बिहाक) -बिहारच्या पश्चिम चंपारणमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका 10 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली आहे. फूटपाथवरून चालत असताना विटांचा तुकडा शेतात पडला, त्यामुळे रागाच्या भरात एका महिलेने मुलीच्या छातीवर लाथ मारल्याचा आरोप आहे. (10 year old girl murdered in Bettiah) मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, दुर्दैवाने उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. हे प्रकरण मुफसिल पोलीस ठाण्याच्या बरवट पसराईन गावात घडले आहे.

कारवाई करण्याचे निर्देश - सचिन प्रसाद यांची मुलगी साक्षी राणी असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या स्थानिक लोकांनी आरोपी महिला रामकली देवीसह पोलीस ठाणे गाठले. मात्र, महिलेने हे आरोप ठामपणे नाकारले. रामकलीने साक्षीला मारले नसल्याचे सांगितले. पोस्टमॉर्टमचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. एसपी उपेंद्र नाथ वर्मा यांनी सांगितले की, मुफसिलचे एसएचओ उग्रनाथ झा यांना कुटुंबीयांच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

छातीवर वार केले - मृत साक्षीच्या वडिलांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वी त्यांची बकरी रामकली यांच्या शेतात गेली होती. यावरून बराच गदारोळ झाला. बुधवारी सायंकाळी त्यांची मुलगी दूध आणण्यासाठी जात असताना शेतात विटेचा तुकडा पडल्याने संतापलेल्या रामकलीने मुलीच्या छातीवर वार केले. असे त्यांचे मत आहे.

पचारासाठी पाटणा येथे दाखल - सर्वप्रथम साझीला रुग्नालयात दाखल करण्यात आले. जिथे तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. दरम्यान, तीची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तीला चांगल्या उपचारासाठी पाटणा येथे रेफर केले. साक्षीसोबत हे कुटुंब मोतिहारी येथील एका खासगी नर्सिंग होममध्ये गेले. जिथे गुरुवारी साक्षीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हेही वाचा -पोटच्या मुलीवर बाप-काकासह अनेकांचा अत्याचार, आरोपी वडीलांसह आईबरोबर काकालाही अटक

ABOUT THE AUTHOR

...view details