नागपूर:वर्ध्या जिल्ह्यातील सेलू तालुक्यात ज्ञान भारती कौशल्य विकास केंद्र येथे नुकतीच फिट 50 प्लस महिला ट्रान्स हिमालयन मोहीमे संदर्भात बैठक झाली. मोहिम 2022 आझादीचा अमृत महोत्सवला अर्पण करण्याचा निर्णय झाला. या साहसी मोहिमेत देशभरातील ५० ते ६० वयोगटातील 10 महिला सहभागी होणार आहेत त्या अरुणाचल प्रदेश ते लडाख अशा 40 पर्वतरांगा सर करणार आहे. या मोहिमेत टाटा स्टील ॲडव्हेंचर फाऊंडेशन (TSAF) द्वारे या मोहिमेचे आयोजन केले जात आहे. त्याला टाटा मोटर्स आणि टाटा स्पोर्ट्स क्लबचे आर्थिक सहकार्य असणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्याही शुभेच्छा
मोहिमेत सहभागी होणाऱ्या 10 सदस्यांच्या टीम सोबत वर्ध्याचा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनीही संवाद साधला. आणि शाळेच्या तसेच कॉलेजच्या दिवसांतील NCC आणि साहसी उपक्रमांच्या आठवणींना उजळला दिला. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी "तुमची पिढी केवळ माझ्यासारख्या लोकांसाठीच नाही तर सध्याच्या तरुणांसाठीही प्रेरणादायी आहे" असे म्हणत गिर्यारोहक बचेंद्री पाल यांच्या कडुन साहसी मोहिमे बद्दल जाणून घेत शुभेच्छा दिल्या.