कुशीनगर -कुशीनगर जिल्ह्यातील खड्डा पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या नारायणी नदीत बोट उलटल्याने ( Boat Capsizes in Khusinagar ) दुर्घटना घडली आहे. स्थानिक लोकांनी 7 जणांचे प्राण वाचवले ( 10 people drowned ) आहे. मात्र, तीन जणांचा मृत्यू ( Kushinagar boat accident ) झाला.
बरीच शोधाशोध केल्यानंतर तिघांचे मृतदेह नारायणी नदीतून बाहेर ( drawn death in Narayani river ) काढण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( CM UP on boat drawn ) यांनी अपघातात जखमी झालेल्यांवर योग्य उपचार देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
उपचार करण्याकरिता मुख्यमंत्र्यांचे निर्देश- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुशीनगर जिल्ह्यातील नारायणी नदीत बोट दुर्घटनेप्रकरणी जिल्हा प्रशासनाला तातडीने घटनास्थळी पोहोचून बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करत त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.