महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

IED Bomb Defused : दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांचा मोठा कट उधळला, सुरक्षा दलाने केला 10 किलो IED जप्त - 10 kg IED Bomb Defused In Dantewada

दंतेवाडामध्ये सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचा मोठा कट उधळून लावला आहे. (naxali big conspiracy failed in Dantewada). झडती दरम्यान 10 किलो IED जप्त करण्यात आला आहे. सुरक्षा दलांनी घटनास्थळीच आयईडी बॉम्ब निकामी केला. (IED Bomb Defused In Dantewada).

IED Bomb Defused In Dantewada
IED Bomb Defused In Dantewada

By

Published : Nov 19, 2022, 10:16 PM IST

दंतेवाडा - छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात नक्षल विरोधी मोहीम राबवली जात आहे. (anti naxalite campaign in dantewada). CRPF जवानांनी पुन्हा एकदा नक्षलवाद्यांचे मनसुबे उधळून लावले आहेत. (naxali big conspiracy failed in Dantewada). सीआरपीएफचे जवान कमलपोस्टहून कोंडासनवलीच्या दिशेने शोधासाठी जात होते त्यावेळी सुरक्षा दलांनी कमलपोस्ट परिसरात 10 किलो IED जप्त केला आहे. (IED Bomb Defused In Dantewada).

झडतीदरम्यान आयईडी जप्त -सीआरपीएफ 231 बटालियनच्या जवानांनी दंतेवाडा येथे शोध दरम्यान 10 किलो आयडी जप्त केला. कमांडंट सुरेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली एरिया डोमिनेशन ड्युटी कमलपोस्ट परिसरात असताना सकाळी ही घटना घडली. सुरक्षेसंदर्भातील सूचनांचे पालन करून सुरक्षा दलाची तुकडी कमलपोस्ट येथून कोंडासनवलीच्या दिशेने जात असताना कमलपोस्ट कॅम्पपासून सुमारे 600 मीटर अंतरावर सीआरपीएफच्या कुत्र्याने संशयास्पद हालचाली दर्शवल्या. यानंतर श्वान हाताळणाऱ्या बीडीडीएस पथकाने आजूबाजूच्या परिसरात बारकाईने शोध घेतला. परिसराची कसून तपासणी केल्यानंतर कमांड वायर मेकॅनिझम कंटेनरसह 10 किलो जिवंत आयईडी जप्त करण्यात आला.

या आधीही अनेकदा आयईडी पेरली: नक्षलवादी सुरक्षा दलांना इजा करण्याचा आणि सुरक्षा दलांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत 231 बटालियनने 132 आयईडी आणि 785 स्पाइक जप्त केले आहेत. बीडीडीएस पथकाने आयईडी यशस्वीरित्या निकामी केला. हा अत्यंत नक्षलग्रस्त भाग आहे. यापूर्वीही या भागात नक्षलवाद्यांकडून अनेकदा सुरक्षा दलांना इजा करण्याचे प्रयत्न झाले आहेत. मात्र 231 बटालियनला नक्षलवाद्यांचे प्रयत्न वारंवार हाणून पाडण्यात यश आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details