कूचबिहार (पश्चिम बंगाल): पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये रात्री उशिरा एक मोठी दुर्घटना घडली. कावडधारकांना घेऊन जल्पेशकडे जाणाऱ्या पिकअप व्हॅनला करंट लागल्याने 10 तरुणांचा मृत्यू झाला. वाहनात ठेवलेल्या डीजे सिस्टीमसाठी लावलेल्या जनरेटरच्या वायरिंगमुळे विद्युतप्रवाह पसरल्याचा संशय आहे. घटनेनंतर काही वेळातच जखमींना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी 10 जणांना मृत घोषित केले (10 dead due to electrocution). व्हॅनमधील 27 पैकी 16 जणांच्यावर उपचारासाठी जलपाईगुडी रुग्णालयात पाठवण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॅनमधील डीजे सिस्टीमच्या जनरेटरच्या वायरिंगमुळे ही घटना घडली असावी. ही घटना रात्री उशिरा 12 वाजण्याच्या सुमारास घडली. ही घटना मेखलीगंज पोलीस स्टेशन अंतर्गत धारला पुलावर घडली. माताभंगाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अमित वर्मा म्हणाले, “जल्पेशकडे कावडधारकांना घेऊन जाणारी पिकअप व्हॅनमध्ये विजेमुळे मोठी दुर्घटना घडली. जनरेटरच्या (डीजे सिस्टीम) वायरिंगमुळे हे घडले असावे, असा प्राथमिक तपासात अंदाज आहे. ते वाहनाच्या मागील बाजूस बसविण्यात आले होते.