कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानभा निवडणुकीचे पडघम वाजले आहे. शनिवारी पश्चिम बंगालमध्ये 5 जिल्ह्यातील 30 विधानसभा मतदारसंघात हे मतदान पार पडले. काही ठिकाणी हिंसक घटनाही घडल्या. हिंसक घटनेत सहभाग घेतेल्या 10 जणांना अटक करण्यात आली आहे. ही माहिती पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी आरिज आफताब यांनी दिली.
पश्चिम मेदिनापूर जिल्ह्यातील सलबोनीमधून सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी माकपा उमेदवार सुशांत घोष यांच्यावर दगडफेक केली होती. तसेच धुक्का-बुक्की केली होती. तर पूर्व मेदिनापूरच्या कांठीमधून तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यांनी भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांचे भाऊ सोमेंदू यांच्यावर हल्ला केला होता.
पहिल्या टप्प्यासाठी 79.79 टक्के मतदान -
पश्चिम बंगालमध्ये 294 जागांसाठी मतदान होणार आहे. हे मतदान आठ टप्प्यात पार पडेल. पहिल्या टप्प्यात शनिवारी 30 मतदारसंघात मतदान झाले. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी 79.79 टक्के मतदान झाले.
पहिल्या टप्प्यात कोणी किती जागा लढवल्या?
पहिल्या टप्प्यात 30 जागांपैकी 29 जागा भाजपाने लढवल्या आहेत. त्यापैकी एक जागा ही अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेला (एजेएसयू) सोडण्यात आली. दरम्यान दुसरीकडे तृणमूलनेही 30 जागांपैकी 29 च जागा लढवल्या असून, एका जागेसाठी त्यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कॉंग्रेसने केवळ पाच जागाच लढवल्या असून, उर्वरीत जागांवर डाव्या पक्षांकडून उमेदवार उभे करण्यात आले होते. सीपीएमने 18 जागा तर सीपीआयने 4 जागा लढवल्या आहेत.
हेही वाचा -पंतप्रधान मोदी आज 'मन की बात' मधून देशवासीयांना संबोधणार