महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 1 दहशतवादी ठार, 24 तासात 4 दहशतवाद्यांना कंठस्नान - चकमकीत 1 दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 1 दहशतवादी ठार. चकमकीत ठार झालेला अतिरेकी उत्तर काश्मीरमधील चोगल हंदवाडा येथील असल्याची माहिती आहे. मात्र, त्याची ओळख अद्याप पोलिसांना पटलेली नाही. गेल्या 24 तासात 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

पुलवामामध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 1 दहशतवादी ठार
पुलवामामध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 1 दहशतवादी ठार

By

Published : Jun 20, 2022, 9:19 AM IST

Updated : Jun 20, 2022, 9:29 AM IST

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील चटपोरा भागात रविवारी रात्री उशिरा सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक अतिरेकी ठार झाला, असे पोलिसांनी सांगितले. हे ऑपरेशन पोलिस, लष्कराच्या 55 राष्ट्रीय रायफल्स आणि CRPF च्या 183,182 बटालियनने संयुक्तपणे केले.

पुलवामामध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 1 दहशतवादी ठार


"पुलवामाच्या चटपोरा भागात चकमक सुरू झाली आहे. पोलीस आणि सुरक्षा दल त्यांचे काम चोखपणे बजावत आहेत," असे काश्मीर झोन पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर आधी ट्विट केले होते. "एक दहशतवादी मारला गेला. शोध सुरू आहे," पोलिसांनी ही माहिती नंतर दिली.

पुलवामामध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 1 दहशतवादी ठार

पुलवामा येथील चटपोरा येथे काही अतिरेकी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. यानंतर पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकांनी परिसराला वेढा घातला. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला आणि चकमक सुरू झाली. रात्रभर जोरदार गोळीबार झाला आणि सोमवारी पहाटे 3 वाजता चकमक संपली.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 1 दहशतवादी ठार. चकमकीत ठार झालेला अतिरेकी उत्तर काश्मीरमधील चोगल हंदवाडा येथील असल्याची माहिती आहे. मात्र, त्याची ओळख अद्याप पोलिसांना पटलेली नाही. दरम्यान गेल्या 24 तासात झालेल्या चकमकीत एकूण 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

हेही वाचा - Maulana Taukir Raza Khan Statement : "या.. नरेंद्र मोदी कलमा वाचा, आम्ही तुम्हाला डोक्यावर बसवू" - मौलाना तौकीर रझा खान

Last Updated : Jun 20, 2022, 9:29 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details