महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Theft at Sonam's House : अभिनेत्री सोनम कपूरच्या घरात चोरी 1.41 कोटी रुपयांचे दागिने,रोख लांबवली - भिनेते अनिल कपूर यांची कन्या सोनम

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या (Bollywood actress Sonam Kapoor) घरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. यात चोरट्यांनी 1.41 कोटी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून (1.41 crore jewelery, cash stolen) नेली. सोनम कपूरच्या सासूने या संदर्भात दिल्लीतील तुघलक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेत अनेक पथके तयार केली आहेत.

Actress Sonam Kapoor
अभिनेत्री सोनम कपूर

By

Published : Apr 9, 2022, 10:55 AM IST

नवी दिल्ली: अभिनेत्री सोनम कपूरच्या (Bollywood actress Sonam Kapoor) घरात चोरट्यांनी मोठा डल्ला मारल्याचे प्रकरण समोर आले आहे. तीच्या घरात 25 नोकरांशिवाय 9 केअर टेकर, ड्रायव्हर आणि माळी आणि इतर कर्मचारीही काम करतात. पोलिस या सगळ्यांची चौकशी करत आहेत. अद्यापपर्यंत आरोपींचा सुगावा लागलेला नाही. हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने पोलिसांनी त्याची जास्त वाच्यता होऊ दिली नव्हती.

सध्या घरातील सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे, मात्र अद्यापपर्यंत चोरीचा कोणताही तपास लागलेला नाही. अशा परिस्थितीत पोलिस फॉरेन्सिक सायन्सची मदत घेण्याचा विचार करत आहेत. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. तुघलक रोड पोलीस ठाण्याचे अनेक पोलीस या प्रकरणाचा कसून शोध घेत आहेत. सोनम कपूरचा पती आनंद आहुजा काका सुनीलसोबत कॅलिफोर्नियामध्ये राहतो. तो वारंवार येतो आणि जातो. पीडित कुटुंबाची साई एक्सपोर्ट्स ही कपड्यांची कंपनी आहे.

ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर यांची कन्या सोनम (Sonam, daughter of actor Anil Kapoor) च्या घरातून हा एैवज लंपास झाला आहे. सोनमने हे दागिने दोन वर्षांपूर्वी पाहिले होते. परंतु तिच्या आजेसासूने दावा केला आहे की, ११ फेब्रुवारी रोजी त्यांनी दागिने आणि रोख रक्कम पाहिली होती. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी सोनम आणि आनंदच्या घरी चोरीच्या प्रकरणाचा तपास सुरू केला. या प्रकरणातील संशयितांना ओळखण्यासाठी ते गेल्या वर्षभरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details