ETV Bharat / politics

ठाकरे पिता-पुत्रांनी दोन वर्षात मुख्यमंत्र्यांना शिव्या-शाप दिल्याशिवाय काय केलं; खासदार श्रीकांत शिंदेंचा सवाल - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 30, 2024, 5:36 PM IST

Shrikant Shinde On Uddhav Thackeray
खासदार श्रीकांत शिंदे आणि आदित्य ठाकरे

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचारसभा दणक्यात सुरू आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांच्या प्रचारार्थ खासदार श्रीकांत शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. खासदार शिंदे यांनी ठाकरे पिता-पुत्रांवर (Aaditya Thackeray) जोरदार हल्लाबोल केलाय.

प्रतिक्रिया देताना खासदार श्रीकांत शिंदे

कोल्हापूर Lok Sabha Election 2024 : युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) मृगजळातून बाहेर आले नाहीत. आदित्य ठाकरे बोलतात ते स्वतःसाठी बोलतात. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे (CM Eknath Shinde) जनतेसाठी काम करतात. ठाकरे पिता-पुत्रांनी महायुतीचं सरकार आल्यापासून शिव्याशाप दिल्याशिवाय काय केलं असा सवाल, खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केलाय. कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते.

धैर्यशील माने यांच्या कामावर नागरिक खुश : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कोल्हापूरवर विशेष प्रेम आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनी केलेल्या कामावर नागरिक खुश आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. फुटबॉलच्या स्टेडियमचं काम लवकरात लवकर सुरू होईल. विकासाच्या मुद्यावरून आम्ही मतं मागण्याचं काम करतोय. आमच्या सर्व मित्र पक्षांची ताकद मजबूत आहे, असं खासदार शिंदे यांनी सांगितलंय.



कल्याणमध्ये राज ठाकरेंची सभा झाल्यास आनंद : महायुतीमध्ये सामील झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची कल्याणमध्ये सभा झाल्यास आनंद होईल. कारण कल्याणमध्ये मनसेची ताकद निर्णायक आहे. कल्याणच्या सभेसाठी आम्ही राज ठाकरे यांना विनंती करणार असल्याचं खासदार शिंदे यांनी सांगितलं.


मुख्यमंत्र्यांचं कोल्हापूरवर प्रेम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून निवडणुकीसाठी जो प्रचार करावा लागतो तो करत आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही कोल्हापूरवर प्रेम आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे कोल्हापुरात थांबून भेटीगाठी घेतात. मुख्यमंत्र्यांचं हे प्रेम निवडणुकीपुरतं नाही तर कोल्हापूरच्या विकासासाठी देखील आहे. कोल्हापुरात भावनिक आवाहन करून मते मागितली जातील पण, नागरिकांनी विकासाच्या मुद्यावर मतदान करावं. केंद्रात पुन्हा एनडीए सरकार येतंय, त्यामुळं जे सत्तेत राहणार त्या उमेदवाराला निवडून द्या, असं आवाहन खासदार शिंदे यांनी केलंय.

हेही वाचा -

  1. विरोधकांकडून फेक व्हिडिओ तयार करण्याचं काम सुरू-पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप - PM Modi Dharashiv visit
  2. तुमच्या संपत्तीवर काँग्रेसचा डोळा, पंतप्रधान मोदींचा दावा - PM Modi solapur meeting
  3. पंतप्रधान मोदींच्या 'त्या' विधानावरून तापलं राजकारण; "ते शरद पवारांच्या मृत्यूची वाट पाहत नाहीत ना? ", जितेंद्र आव्हाड यांचा सवाल - PM Modi Maharashtra visit
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.